सर्च, रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष मेंदुविकार ओपीडी सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च रुग्णालयात आता लहान मुलांसाठी नव्या आरोग्य सुविधेची सुरुवात करून  विशेष मेंदुविकार ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे. या  सुविधेमुळे मेंदुविषयी विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर ओपीडी प्रत्येक  महिनाच्या दुसर्‍या शुक्रवारला ठरविण्यात आलेली असून त्या ओपीडीसाठी  नागपूरचे विशेषज्ञ न्यूरोलॉजिस्ट डॉ.अमरजीत वाघ आरोग्य तपासणी साठी नियमित सर्च रुग्णालयात येणार आहेत.
 सर्च  रुग्णालयामध्ये  मेंदूविकारांवर उपचारासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर यांचे मार्फतिने आरोग्य तपासणी सुविधा देण्यात येत आहे. लहान मुलांची  मेदुविकार ओपीडी सुरु झाल्यामुळे अनेक फायदे होणार आहेत. त्यामुळे निदान आणि उपचार अचूक आणि प्रभावी होणार आहेत. निदान लवकर झाल्यामुळे लहान मुलांमधील मेंदूचे विकासात्मक विकार, फिट्स (मिरगी),  दृष्टीदोष, ऐकू न येण्याची  समस्या,बोलण्यास  विलंब,  लक्ष, शिकणे किंवा स्मरणशक्ती मध्ये समस्या, तिव्र डोखेदुखी, वर्तणुकीत बदल व इतर यांसारख्या गंभीर आजारांचे तात्काळ निदान होईल, ज्यामुळे लवकर योग्य उपचार सुरू करता येतील.
 समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल,  निर्धन व  प्रत्येक घटकातील  रुग्णांना मोफत दरात उत्कृष्ट आरोग्य विषयक सेवा मिळणार आहे.  मुलांच्या समस्या समजावून सांगण्यासाठी पालकांना  समुपदेशन सुविधा देण्यात येतील.  सीटी स्कॅन, ईईजी, एमआरआय  यांसारख्या आवश्यक चाचण्या सर्च रुग्णालयातर्फे मोफत दिल्या जातात, त्यामुळे वेळेची आणि खर्चाची बचत होईल.
 लहान वयातच बालकांच्या मेंदुविकारांवर उपचार झाल्यामुळे  लहान मुलांच्या आरोग्यासाठी  या ओपीडीमुळे मेंदुविकारांवरील उपचार  करणे सोपे व प्रभावी होणार आहेत. प्रत्येक  महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारला ओपीडी  नियोजित केली असून प्रथम  तपासणी शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ ला आयोजित केली आहे. विशेष करून  १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ग्रामीण भागातील गरजू व गरीब मुलांना  उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णायाकडून  विशेष आर्थिक सुविधा देत आहे. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी मेंदुविकार ओपीडीचा  लाभ घ्यावा, असे  सर्च रुग्णालयांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.