हिवाळ्यात आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम पाण्याने,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

हिवाळा सुरु असून  सध्या थंडीचा महिना सुरु आहे.  या दिवसामध्ये हाडे गोठवणारी थंडी पडत असल्याने उबदार राहण्यासाठी  गरम पाण्याने आंघोळ करणे, स्वेटर वापरणे, शेकोटी पेटवणे या सारखे उपाययोजना करतात…

थंडीच्या दिवसात थंड्या पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने करावी असा प्रश्न पडतो. थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर काही जणांना जास्त थंडी वाजते. तर काहीना थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्ट्रोक येतो. परंतु  थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. थंड पाण्याने आंघोळ करताना सरळ डोक्यावर थंड पाणी घेऊ नये. आधी हात आणि पायांवर थंड पाणी टाकावे. त्यानंतर शरीरावर थंड पाणी टाकावे. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्वचा चमकदार आणि सुदृढ होते. शरीरातील स्नायू मजबूत होतात. तसेच व्यायम आणि इतर शारीरिक हालचालींसाठीही मदत होते. मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि  ताण कमी होतो.

याउलट गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होते. डोक्यावर सरळ गरम पाणी गेल्यानंतर केस कमकुवत होतात. गरम पाण्याने   केसांमध्ये ड्रायनेस येते आणि चमकही कमी होते. गरम पाणी आंघोळीसाठी जरी  चांगले वाटत असले तरी आरोग्यास अनेक प्रकारचे  नुकसान आहे. त्यामुळे हिवाळ्यात गरम पाण्याऐवजी सामान्य पाणी घेतल्यास त्याचे अनेक फायदे होतात.

हे पण पहा,

मुल तहसील कचेरीवर धडकणार निळया वादळाचा आक्रोश

मंत्रिमंडळ खाते वाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु !

 

थंडीच्या दिवसात थंड्या पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने करावीसध्या थंडीचा महिना सुरु आहे.