चांगल्या गोष्टीचा आनंद म्हणजे अत्याधुनिक जिम- आ.अभिजित वंजारी

शरीर सुदृढ असेल तरच जीवनातील सर्व चांगल्या गोष्टीचा आनंद मिळेल त्यासाठी  अत्याधुनिक जिमची  गरज.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी ०२ जानेवारी :- माणसाचे निरोगी आयुष्य दुर्मिळ झाले आहे . भरपूर धन-दौलत आणि यश मिळालं पण शरीर प्रकृती खराब झाली तर यशाचा आणि संपत्तीचा काहीच फायदा होणार नाही . जीवनात जर काही महत्त्वाचं आणि अमुल्य असेल तर म्हणजे मानवी शरीर आणि त्यासाठी शरीर सुदृढ ठेवायच असेल तर अत्याधुनिक जिमचा उपयोग करावा असे प्रतिपादन नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाचे आ. अभिजित वंजारी यांनी केले. आरमोरी येथील आप्पा फिटनेस जिम कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते.


या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गंगाधर सोमकुंवर , अध्यक्ष म्हणून प्राचार्य सचिन खोब्रागडे , आप्पा फिटनेसचे जिमचे संचालक तथा नगरसेवक .आप्पा उर्फ प्रशांत सोमकुंवर, पञकार प्रविण राहटे आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य सचिन खोब्रागडे म्हणाले- ज्यासाठी व्यायाम एक सर्वोत्तम गुरूमंञ आहे,. व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता व क्रियाशक्ती वाढते. त्याचबरोबर आपली प्रातिकारशक्ती देखील वाढते . जर देशातील प्रत्येक कुटुंब स्वास्थ्य व निरोगी असेल तर नक्कीच आपल्या देशाची आर्थिक स्थितीदेखील सुधारू शकेल त्यासाठी व्यायाम हा स्वास्थाच्या रक्षाणाचा उत्तम मंञ आहे असे प्रतिपादन प्राचार्य सचिन खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक आप्पा फिटनेस जिमचे संचालक तथा नगरसेवक-आप्पा उर्फ प्रशांत सोमकुंवर यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन मकर वंजारी यांनी केले .