गडचिरोली जिल्हात आज 38 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:13मार्च

आज जिल्हयात 38 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9855 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9516 वर पोहचली. तसेच सद्या 231 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.34 टक्के तर मृत्यू दर 1.10 टक्के झाला.

       नवीन 38 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 21, आरमोरी तालुक्यातील 5, धानोरा तालुक्यातील 1, एटापल्ली 3,  कोरची 6, तर वडसा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 13 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 10, अहेरी 1, कोरची 1, तर वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.
    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील गोंडवाना विद्यापीठाच्या पुढे 2, कॅम्प एरिया 2, गोकुलनगर 2, गोंडवाना सैनिकी विद्यालय जवळ 1, कलेक्टर कॉलनी 1,  कन्नमवार वार्ड 1, स्थानिक 3, नवेगाव 2, मारेगाव 1, सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कुल अडपल्ली जवळ 2, महिला महाविद्यालयाजवळ 1, म्हाडा कॉलनी 1, मोरेश्वर पेट्रोलपंपच्या मागे 1, किसन विद्यालय जवळ जेप्रा 1, आरमोरी तालुक्यातील स्थानिक 3, जोगीसाखरा 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चातगाव 1, एटापल्ली तालुक्यातील स्थानिक 3, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये पी एस 5, स्थानिक 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona Report News Today