उद्यापासून १५ ते १८ वर्षे वयोगट कोविड लसीकरण शुभारंभ

पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. २ जानेवारी :  कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे विनामूल्य लसीकरण करण्याची मोहीम उद्या सोमवार, दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून मुंबईत ९ समर्पित कोविड केंद्रांवर सुरु होणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रातून सकाळी ११ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी होतील.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध पदाधिकारी व अधिकारी हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहतील.

सदर कार्यक्रम बीकेसी कोविड सेंटरच्या फेसबुक अकाउंट वरून थेट प्रक्षेपित होईल. त्याची लिंक सोबत पाठवित आहे. सर्व सन्माननीय प्रसारमाध्यम प्रतिनिधींना https://www.facebook.com/events/462634301912263/  या लिंकद्वारे कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल.

हे देखील वाचा  : 

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड घेणार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा आढावा

धक्कादायक! लग्नाला नकार देऊनही तरुण काढायचा छेड; छेडछाडिला कंटाळुन युवतीने केली आत्महत्या

जिल्हा गौरव पुरस्कारासाठी नानाजी वाढई यांची निवड

Covid vaccinelead news