गृहमंत्री अनिल देशमुखांनी सपत्नीक दुर्गम पातागुडम येथे पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा: 14नोव्हेंबर

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सपत्नीक सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली.
जनतेच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी सपत्नीक यंदाची दिवाळी गडचिरोली पोलिस दलासोबत साजरी केली. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांना दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला जमत नाही. त्यामुळे आपण पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली, असे सांगून गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. याप्रसंगी गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या अडचणी समजून घेत, सरकार सदैव पोलिस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अन्य अधिकारी, पोलिस जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.