पुरात मुतापूर जिप शाळेतील दस्तावेज भिजले..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट..!!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सिरोंचा ,1/ऑगस्ट :- जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पाऊस आणि मेडिगड्डा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर येऊन असरअल्ली येथून जवळच असलेल्या मुत्तापूर जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरून शाळेतील संपुर्ण दस्तऐवज पाण्यात भिजले आहेत.यामध्ये शाळेतील शालेय अभ्यासक्रमात वापरले जाणारे साहित्य आणि जुना रेकार्ड तसेच विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या विविध साहित्य आणि पुस्तक आणि इतर महत्वाचे कागदपत्रे भिजले असून माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार असरअल्ली परिसरातील पाण्याखाली आलेल्या जिप शाळेना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतल्या आहे.पाण्याखाली येऊन शाळेतील साहित्य खराब झाले असून शासनाला पाठपुरावा करून तत्काळ सदर शाळांना साहित्य पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असे यावेळी कंकडालवार यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले.पुरात तालुक्यातील अनेक शाळेचे इमारती पाण्याखाली बुडाले असून भविष्यात इमारती कोसळण्याची भीती नाकारता येत नसल्याने पाण्याखाली बुडालेल्या सर्व शाळेच्या इमारतीच्या पाहणी करून शाळेत विद्यार्थ्यांना बसविण्यात यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे..!!

यावेळी माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,अविस अध्यक्ष बानय्या जनगाम,अविस जेष्ठ नेता शंकर मंदा,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, धर्माय्या कोठारी,उपसरपंच सल्ला मॅडम,माजी सभापती भास्कर तलांडी,माजी जिप सदस्य अजय नैताम,सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सूरज गावडे,माजी सरपंच दिलीप गंजीवार,नप सिरोंचा स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार,किरण वेमुला, संतोष भिमकरी,अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला,सतीश जवाजी,साई मंदा, गणेश राच्चावार, विजय तुमडे,संजय चिंताकन्नी,सागर कोठारी,समय्या तोरकरी, सुकदेव, महेश तोरकरी, स्वामी चप्पिडी,सडवली राजु गूडूरी,दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले,लक्ष्मण गावडे,कलाम शेख, विनोद भूपती, रमेश धर्मी,महेश तलांडी,संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..!!

हे देखील वाचा :- 

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा : भाई रामदास जराते यांचे आवाहन…

gadchiroli flood