लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 19 जुलै – राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधानसभेत बोगस बियाणं आणि खतांचा मुद्दा प्रश्नोत्तरामध्ये काँग्रेस आमदारांकडून मांडण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राइट टू रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला. खतांच्या दरनियंत्रणासाठी केंद्राकडून 1 लाख 30 हजार कोटींची सबसिडी देण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली.
कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खते विक्री संदर्भात कारवाई सुरू केली आहे. 164 मेट्रीक टन साठा बियाणांचा जप्त केला आहे. 22 पोलीस केसस दाखल करण्यात आल्या आहेत. 20 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 105 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. खतांसंदर्भात गुणनियंत्रण विभागाने 190 टन साठा जप्त केला आहे. त्यासंदर्भात 13 पोलीस केसेस दाखल करण्यात आले आहे.
52 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 210 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय मागील कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषीमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकासमंत्री, पाणीपुरवठामंत्री अशी एक समिती करण्यात आली आहे.
हे पण वाचा :-