10 बोरी, 2 ड्रम सडव्यासह तीन हातभट्टी उद्ध्वस्त

तीन जणांवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नरेंद्रपुर येथील दारू विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटन, ग्रामपंचायत समितीने मोहीम हाती घेतली आहे. नुकतेच घोट पोलीस, वनविभाग व  मुक्तीपच्या सहकार्याने जंगलपरिसरातील तीन दारू भट्ट्या, दहा बोरी व दोन ड्रम सडवा असा एकूण 1 लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्रपुर येथे अवैध दारूविक्री केली जाते. या गावात सात विक्रेते सक्रिय असून इतर गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जात होता. गावात दारूबंदी लागू करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. सोबतच अहिंसक कृतीच्या माध्यमातून विक्रेत्यांचा मुद्देमाल देखील नष्ट करण्यात आला आहे. गावातील काही विक्रेत्यांनी जंगलपरिसरत हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे घोट पोलीस, वनविभाग, गाव संघटन, ग्रामपंचायत समिती व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली असता, तीन हातभट्टया आधळून आल्या. घटनास्थळावर 10 बोरे व 2 ड्रम मोहफुलाच्या सडव्यासह 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन दारू विक्रेत्यांवर घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या कारवाईच्या धास्तीमुळे गावातील ठोक व किरकोळ दारू विक्रेत्यांनी गाव सोडून पळ काढला आहे.
 ही कारवाई पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार दुलाल मंडल, पोलीस कर्मचारी साईकृपा मुरकुटे यांनी केली. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष महेश बिश्र्वास, ग्रामपंचायत सदस्य सरोज तरफदार, वनविभागाचे जिल्ले, शंकर गेडाम, दिलीप यगंटीवार, संतोष राऊत,  युवा सदस्य किशोर कुंडू, लक्ष्मीकांत मंडल, बिरेन तरफदार, कमल विश्वास, विश्वजित विश्वास, मुक्तीपथ चे आनंद इंगळे, आनंद सिडाम ,विनोद पांडे यांचा सक्रिय सहभाग होता.

 

Comments (0)
Add Comment