लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 15 जुलै – मुक्तिपथ अभियानातर्फे गडचिरोली, एटापल्ली, आरमोरी, देसाईगंज, सिरोंचा, मूलचेरा, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात तालुका क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून 109 रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
तालुक्यातील रुग्णांना उपचाराचा सोय उपलब्ध व्हावी, या हेतून मुक्तिपथ अभियानातर्फे बाराही तालुक्यातील कार्यालयांमध्ये नियोजित दिवशी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जाते. आतापर्यंत अनेक रुग्ण उपचार घेत दारूमुक्त झाले आहेत. या आठवड्यात गडचिरोली 12, एटापल्ली 13, आरमोरी 14, देसाईगंज 13, सिरोंचा 13, मूलचेरा 13, चामोर्शी 14, कुरखेडा 9, अहेरी 8, रुग्णांनी उपचार घेतला. अशा एकूण 109 रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
यावेळी रुग्णांना समुपदेशन सुद्धा करण्यात आले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. तसेच रुग्णांवर औषधोपचार सुद्धा करण्यात आले. क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतल्यास व्यसनातून मुक्त होण्यास मदत मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे करण्यात आले.
हे पण वाचा :-
https://youtube.com/live/varP9s16E6E?feature=share
https://youtube.com/live/AF5KwjOgpIA?feature=share