12 – गडचिरोली- चिमुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी

तब्बल 1 लाख 40 हजार 234 मतांनी भाजपचे विद्यमान खा. अशोक नेते यांचा किरसान यांनी केला पराभव..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 04 जुन गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6 लाख 17 हजार 792 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी उपस्थित होत्या.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान विजयी.तब्बल 1 लाख 40 हजार 234 मतांनी भाजपचे विद्यमान खा. अशोक नेते यांचा किरसान यांनी केला पराभव. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना 4,74,376 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांना 6,14,610 मते मिळाली.

शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते – अशोक नेते, भारतीय जनता पार्टी (476096), योगेश गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (19055), धीरज शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (2174), बारीकराव मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (2555), सुहास कुमरे,भीमसेना (2872), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (15922), करण सयाम, अपक्ष (2789), विलास कोडापे, अपक्ष(4402), विनोद मडावी, अपक्ष (6126), नोटा (16714). एकूण वैध मते 11 लाख 66 हजार 497.

हे पण वाचा :-

ashok netegadchiroli loksabha election reslutnamdev kirsan