20 लिटर दारुसह 13 पोते मोहफुलाचा सडवा नष्ट

गडचिरोली पोलिस व मुक्तीपथची कृती
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 5 ऑगस्ट 2023 :गडचिरोली स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहझरी येथील दारू विक्रेत्या विरोधात मोहीम राबवत 20 लिटर दारूसह 13 पोते मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची संयुक्त कृती गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने केली.

मोहझरी या गावात मोहफुलाच्या दारुसह देशी, विदेशी दारूची विक्री केली जाते. दारू विक्रीसाठी हे गाव कुप्रसिद्ध आहे. या गावात काटली, पोर्ला, नवरगाव, साखरा, नगरी, वसा या गावातील दारू शौकीन दारू पिण्यासाठी येतात. अशातच गाव संघटन यांच्या गुप्त माहितीचे आधारे मुक्तीपथ व पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करीत मोहझरी येथील संतोष शेंडे याच्याकडून 20 लिटर दारू अंदाजे 6000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला.
शेत शिवारात शोध मोहीम राबवली असता वेगवेगळे ठिकाणाहून 13 पोते मोह सडवा व साहित्य अंदाजे किंमत 89000 रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळी नष्ट करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक येमाजी कावळे, मुक्तीपथ चमू अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम यांनी केली.
हे पण वाचा :-
https://youtu.be/0W5cwagvLOw
https://youtu.be/eYC4zWxQe7w