पर्यावरणदिनी स्वयं रक्तदाता समिती तर्फे आयोजित शिबिरात १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

गडचिरोली जिल्हा स्वयं रक्तदाता समिती चा पुढाकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली जिल्हा स्वयं रक्तदाता समिती व सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्याने विक्रमपूर रोपवाटिका चामोर्शी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग यांनी केले होते. यात मारुती येलकुंचेवार, राकेश गव्हारे, मनोज शेट्टीवार, सुहास डांगे, विकास मडावी, स्वप्निल मेश्राम, शरद उराडे, गोपाल नंदेश्वर, प्रकाश सहारे, दीपक आभारे, नीरज आभारे, प्रकाश सातपुते, चंपत मडावी, पंकज लाड, अतुल कोठारे, पुरुषोत्तम कोटांगले, विठ्ठल मेश्राम, राजू सहारे व रोहित बंडावर यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.

या शिबिरात वपअ नितीन हेमके, अमित शेटीया, निलेश विश्रोजवार, वनपाल घेरकर, वनरक्षक अलोणे, चारुदत्त राऊत, वैभव घोंगळे, माणिक बनिक व इतर सर्व सहकाऱ्यांची उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वीतेकरिता डॉ. अन्सारी, नरेश कंदुकुरिवार,  सुरत चांदेकर, जीवन गेडाम, प्रतीक्षा कोटांगे व गोरडवाडी यांनी मदत केली.

गडचिरोली जिल्हा स्वयं रक्तदाता समिती यांनी रक्तदान शिबिर घेऊन रक्तपेढी येथिल रक्तसाठा वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर रुग्णांना व जे रक्तदाते असतात त्यांच्या नातेवाईकांना कधी रक्ताची गरज भासल्यास त्यांना तात्काळ रक्त मिळवून देण्यास सुद्धा मदत करते. त्यामुळे आपण कुठे रक्तदान करत आहोत ते आधी तपासून रक्तदान करावे.

मनोज पिपरे – केंद्रप्रतिनिधी जिल्हा स्वयं रक्तदाता समिती, गडचिरोली.

blood donate camplead storymanoj pipresway raktdata samiti