शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान

राज्य मंत्रिमंडळ बैठक अतिरिक्त निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई: सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासन मान्य खाजगी अंशत: अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकषांची पूर्तता केलेल्या 820 प्राथमिक शाळा, 3513 वर्ग/ तुकड्या व त्यावरील 8602 शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, 1984 माध्यमिक शाळा, 2380 वर्ग/तुकड्या व त्यावरील 24028 शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, 3040 उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय, 3043 वर्ग/तुकड्या/ अतिरिक्त शाखा व त्यावरील 16932 शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, ( एकूण 5844 शाळा, 8936 वर्ग/तुकड्या/अति.शाखा व त्यावरील एकूण 49562 शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी) अनुदानाच्या विविध टप्पावर वेतन अनुदान घेत आहेत. त्यांना 20 टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला.

Comments (0)
Add Comment