एसटीची पलटी झाल्याने २२ प्रवासी जखमी

अक्कलकोट तालुक्यातील घटना..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापूर,दि, २४ जुलै: सोलापूर- गाणगापूर एसटीची अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी पुलाजवळ अपघात झाला असून या एसटीची टायर खराब झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटीची पलटी झाली आहे .यामध्ये साधारणता 22 प्रवासी प्रवास करत होते .यामध्ये 22 प्रवासी जखमी झाले असून यातील तीन प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

सदर घटनेची माहिती प्रशासनाला  10: 45  सुमारास माहिती होताच .अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय आणि सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . मात्र जखमींची संख्या जास्त असल्याने सदर रुग्णालयात वैद्यकीय सुविधा अपुरे असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील तसेच काही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना देखील पाचारण करण्यात आले. हा अपघात 10: 45 सुमारास घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .

हे देखील वाचा ,

आंतरराष्ट्रीय जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ‘मान्सून आर्ट शो’ गडचिरोलीची रुषाली उईके हिच्या कलाकृतीची प्रदर्शनात निवड

आर्थिक विवंचना व्यापाऱ्यांना ठरते का जीवघेणी?

 

आरोग्य विभागाने औषधी भांडार निर्माण करावा; उमाजी गोवर्धन यांची मागणी

solapur bus eksedent