मुलचेरातील शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू ,खर्रा खाणाऱ्या २३ जणांवर दंड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : शासकीय कार्यालयात खर्रा-तंबाखू खाऊ नये, असा नियम आहे. तरी देखील मुलचेरा शहरातील नागरिक, कर्मचारी कार्यालयीन वेळेत खर्रा, तंबाखू सेवन करून होते, अशा २३ जणांवर मुक्तीपथ, तहसील ऑफिस, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई केली.
शासकीय कार्यालयात तंबाखू, खर्रा, अंमली पदार्थ सेवन करू नये, असा नियम आहे. तरी देखील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी तसेच कार्यालयात येणारे नागरिक नियमांना गुंडाळून ठेवतात. तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सोबतच राज्य सरकारने तंबाखू बंदी कायदा अमलात आणला आहे. तरीसुद्धा विक्री व खाणाऱ्यांची संख्या बरीच आहे. यासाठी तंबाखूविरोधी जनजागृती देखील केली जात आहे.
 मुलचेरा शहरातील ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, महसूल विभाग, तहसील कार्यालय या शासकीय कार्यालयांमध्ये मुक्तीपथ, तहसील ऑफिस, आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या विशेष पथकाने मोहीम राबविली. यावेळी शासकीय कामकाजाच्या वेळेत काही नागरिक व कर्मचारी खर्रा-तंबाखू सेवन करून आढळले. तसेच सोबत बाळगणाऱ्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली. या मोहिमेत २३ तंबाखू सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ३ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करून तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, तंबाखू विरोधी कायदे आदींची माहिती नागरिकांना देण्यात आली.

https://youtu.be/XTP-UeiCPUg
gadchiroli nicotinkhra