पोलिसांच्या पुढाकाराने ३ नादुरस्त हातपंप झाले दुरस्त; नागरिकांनी केले कौतुक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भामरागड, दि. ३ जानेवारी : पोलीस मदत केंद्र, कोठी च्या हद्दीमध्ये असलेले ३ नादुरस्त हातपंप पोलीस विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आल्याने येथील नागरिकांच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षानिमित्त कोठी वासियांना पोलिसांकडून हि एक भेटच ठरली आहे.    

गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, सोमाय मुंडे, अनुज तारे व भामरागड उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र कोठी येथील कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचारी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम करीत असतात.

त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस मदत केंद्र, कोठी येथे जनजागरण मेळावा दरम्यान महिला आणि नागरिकांनी कोठी येथील हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशी तक्रार पोमके कोठी चे प्रभारी अधिकारी श्रीनिवास धुळे यांना केली होती.

सदर तक्रारी बाबत प्रभारी अधिकारी यांनी भामरागड येथील बोरवेल दुरुस्ती कार्यालयातील खोब्रागडे यांच्याशी समन्वय साधून तात्काळ आज ०३ जानेवारी २०२२ रोजी तीनही हातपंप दुरुस्त करून घेतले. त्यामुळे कोठी गावात पाण्याची टंचाई निर्माण होत होती ती आता दूर झाली असल्याने गावातील नागरिकांत पोलीस विभागाचे कौतुक केल्या जात आहे.

सदर कार्यामध्ये कोठीचे प्रभारी अधिकारी श्रीनिवास धुळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार वाघ तसेच जिल्हा पोलीस अंमलदार व भारतीय राखीव बटालियन औरंगाबादचे जवान यांनी श्रमदान करून सदर कार्यात मदत केली.

हे देखील वाचा : 

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

जिल्हा गौरव पुरस्कारासाठी नानाजी वाढई यांची निवड

सांस्कृतिक कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

Clead news M Uddhav Thakareykothilead news