लोकस्पर्श न्युज नेटवर्क
धानोरा, 19 एप्रिल : धानोरा तालुक्यातील जांभळी व घोटेविहीर जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आलेला 32 ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कृती गाव संघटनेच्या सहकार्याने मुक्तीपथ तालुका चमूने केली.
धानोरा तालुक्यातील जांभळी, घोटेवीहिर, सीताटोला या गावांमध्ये अवैध दारूविक्री केली जात असून येथील विक्रेत्यांनी जंगलपरिसरात विविध ठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गाव संघटनेच्या सहकार्याने मुक्तीपथ तालुका चमूने जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान विविध ठिकाणी हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याचे दिसून आले. सोबतच ठिकठिकाणी मोहफुलाच्या सडव्याचे 32 ड्रम व साहित्य मिळून आले.संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात यश आले आहे.
हे पण वाचा :-