लॉकडाऊन मुळे शीख समाजाच्या ‘हल्ला मोहल्ला’ मिरवणुकीला मज्जाव करणाऱ्या पोलिसांवर हल्ला, ४ पोलीस गंभीर तर १० जखमी

  • नांदेड मध्ये लॉकडाऊन मुळे शीख बांधवांच्या हल्लाबोल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली.
  • संतप्त जमावकडून पोलिसांवर दगडफेक.
  • परिस्थिती नियंत्रणात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. ३० मार्च: नांदेड मध्ये लॉकडाऊन असल्याकारणाने होळीनंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. मात्र सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भाविक गुरुद्वारात मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिसांनी लॉकडाऊन च्या परिस्थितीत नाकारण्यात आलेल्या  मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस बंदोबस्त व चौरस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. दरम्यान काही लोकांनी पोलिसांशी हुज्जत घालून बॅरिकेट्स तोडली त्यामुळे तणाव वाढला पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर जमावाने केलेल्या हल्ल्यात ४ पोलीस गंभीर जखमी तर १० पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या गाड्या वर दगडफेक करण्यात आली. तर अनेकांचे मोबाईल ही यावेळी फोडण्यात आले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्ववभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीला नाकारलेल्या परवानगीच्या विरोधात एकत्र येत पोलिसांवर केलेल्या सामूहिक हल्ल्याची समाजातल्या सर्वच स्तरातून निषेध व्यक्त  होत असून  प्रशासनाने गँभीर दखल घेतली असून याबाबत कडक कारवाई चे संकेत दिसत आहेत.

Shikh Religions Programme