लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : मुक्तिपथतर्फे जिल्हाभरातील तालुका मुख्यालयी सुरु असलेले तालुका क्लिनिक संबंधीत तालुक्यातील रुग्णांसाठी लाभदायक ठरत आहे. रुग्णांना समुपदेशनासह योग्य औषोधोपचार मिळत असल्याने दारूचे व्यसन सोडणे रुग्णांना शक्य होत आहे. मागील आठवड्यात एकूण ४८ रुग्णांनी लाभ घेत व्यसनमुक्त होणाच्या निर्धार केला आहे.
देसाईगंज तालुका क्लिनिकला ६, अहेरी ६, एटापल्ली १६, आरमोरी ५ तसेच गडचिरोली येथील क्लिनिकला १५ पेशन्टनी भेट दिली. यावेळी तज्ञ संयोजक यांनी केस हिष्ट्री घेत रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेत मार्गदर्शन केले. समुपदेश यांनी दारूचे व्यसन लागण्याचे कारण व नुकसान पटवून दिले. शारीरिक, मानसिक व आरोग्याचे दुष्परिणाम सांगितले. व्यसन सोडण्यासाठी इच्छाशक्ती दृढ असणे गरजेची आहे.
यासाठी दिलेल्या औषोधोपचाराचे नियमित सेवन करण्यासोबतच दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. तालुका क्लिनिकतून एकदा उपचार घेतलेल्या रुग्णांचे नियमित पाठपुरावा घेत संबंधितांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेतली जाते. यामुळे रुग्णांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतो.