संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तब्बल ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती,  दि. ३  मार्च: अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता कोरोना अमरावती विद्यापीठा पर्यंतही पोहोचला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली, या चाचणीमध्ये जवळपास एकूण 300 कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी 56 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी 13 कर्मचाऱ्यांचे अख्खं कुटुंब कोरोना बाधित झाले आहे. कोरोना बाधित झाल्याची माहिती अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ हेमंत देशमुख यांनी दिली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्याचा शैक्षणिक कारभार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातुन चालतो. यामुळे येणाऱ्या काळात याचा परिणाम विद्यापीठाच्या परीक्षा व निकालावरही होऊ शकतो.

Sant Gadgebaba University Amravati