६० रुग्णांनी केला दारूमुक्त होण्याचा निर्धार

विविध गावात शिबीर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 20 मे – गाव संघटनेच्या मागणीनुसार विविध गावांमध्ये मुक्तिपथच्या मार्फतीने गाव पातळी व्यसन  उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामाध्यमातून एकूण ६० रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये अंगारा १६, डोंगरगाव हलबी १३, कंबलपेठा १६ व मैलाराम येथील १५ रुग्णांचा समावेश आहे.

कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबीर घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये १५ रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला. साईनाथ  मोहुर्ले यांनी समुपदेशन केले. नैना मेश्राम व कान्होपात्रा राऊत यांनी केस हिस्ट्री घेतली.  शिबिराचे नियोजन व रुग्णांची नोंदणी मुक्तिपथचे विनोद पांडे यांनी केली. यशस्वीतेसाठी सरपंच रेखा कोकोडे, तंटामुक्त अध्यक्ष दादाजी सुखारे, प्रमोद मेश्राम, बबन कोवे, गोपाल नैताम व गाव संघटन सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव हलबी येथे आयोजित शिबिरातून १३ जणांनी पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची केस हिस्ट्री नैना घुगुस्कर तर समुपदेशन छत्रपती घवघवे यांनी केले. शिबिराचे नियोजन व पेशंट नोंदणी अनुप नंदगिरवार यांनी केली. यासाठी पोलिस पाटील पुरुषोत्तम धानगुने, गावातील युवक, गाव संगटना सदस्य धरत, गुरुदेव सेवा मंडळ सदस्य यांनी सहकार्य केले.
सिरोंचा तालुक्यातील कंबलपेठा येथील शिबिरातून १६ पेशंटने पूर्ण उपचार घेतला. समुपदेशन पुजा येल्लुरकर यांनी केले. केस हिस्ट्री साईराम सेनिगरापू यांनी घेतली. शिबिराचे आयोजन व नियोजन सिरोंचा तालुका चमू यांनी केले. यशस्वीतेसाठी गावातील आशा वर्कर यांनी सहकार्य केले. अहेरी तालुक्यातील मैलाराम येथे एक दिवसीय गावपातळी व्यसन उपचार शिबिर पूर्ण झाले. शिबिरामध्ये १५ पेशंटनी पूर्ण उपचार घेतला. पेशंटची नाव नोंदणी आनंदराव कुम्मरी यांनी केली. केस हिस्ट्री स्वप्निल बावणे यांनी घेतली तर पेशंटला समुपदेशन व औषधोपचार पूजा येल्लूरकर यांनी केला. शिबिराचे नियोजन स्वप्निल बावणे यांनी केले.
हे पण वाचा :-
https://youtu.be/vhFgRAG-78E