45 लाखाचा 650 किलो गांजा जप्त.

धडगाव तालुक्यातील निगडी चा कुंद्यापाडा शिवारात गांजाच्या शेतीवर कारवाई.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नंदुरबार, 1 एप्रिल :- नंदुरबार जिल्ह्यातील धडगावात गांजाची शेती करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल 45 लाख 39 हजार रुपये किमतीच्या 650 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. धडगाव तालुक्यातील निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका व्यक्तीने आंब्याच्या वनराई जवळ गांजाची बेकायदेशीर गांजा लागवट केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या पोलिसांनी पाहणी केली असता पोलिसांना पाहताच संबंधित आरोपी तिथून पळ काढत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता हिरवट रंगाची 648 किलो वजनाचे एकूण 479 गांजाची झाडे आढळून आली. आरोपी रूपजा सिंगा पाडवी यांच्यावर कारवाई केली असून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :-

पोलीस नक्षल चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा; गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश