यावर्षीच्या गणपती उत्सवा दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी चालवणार विशेष 72 रेल्वेगाड्या : मंत्री रावसाहेब पाटील दानवे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १४ जुलै : सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.

गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल. या गाडीच्या एकूण 36 ट्रिप होतील. तसेच CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल. या गाडीच्या 10 ट्रिप होणार आहेत.

पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या 16 ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल. या गाडीच्या एकूण 10 ट्रीप होणार आहेत. असे मंत्री दानवे यांनी सांगितले.

आपण प्रत्येकाने कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासा दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहीजे. 72 गाड्या सोडूनही जर वेटींग असेल. प्रवासाची अडचण होत असेल तर भारत सरकार रेल्वे मंत्रालय अजुनही गाड्या सोडेल असे निर्देश पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र कोकणवासीयाची प्रवासा दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पुर्ण काळजी घेत आहोत.

हे देखील वाचा :

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: उपवनसंरक्षक शिवकुमारला अखेर सशर्त जामीन

एमपीएससीच्या परीक्षा, नियुक्त्या घेण्याच्या मागणीसाठी कराळे गुरुजींच्या नेतृत्वात आंदोलन

अखेर शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात नेलेल्या धानाची खरेदी

 

lead storyraosaheb danve