डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने पाठवले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या २१ रुग्ण आढळले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. २२ जून : राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आले. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत.

या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की, या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनि केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.

हे देखील वाचा :

LIC कन्यादान पॉलिसी: २५ वर्ष रोज १३० रुपये भरा आणि मुलीच्या लग्नासाठी मिळवा २७ लाख रुपये

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!

 

lead storyRajesh Tope