बेतकाठी गावशिवारात 8 ड्रम मोह फुलाचा सडवा व साहित्य नष्ट

- बेतकाठी गवसंघटन व मुक्तिपथ संघटना यांची संयुक्त कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : कोरची पोलीस स्टेशन हद्दीतील  बेतकाठी या गावातील शेतशिवारात  मुक्तीपथ गाव संघटना व तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करीत शेत शिवारतील 8 ड्रम मोह फुलाचा सडवा व साहित्य  एकूण 72 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केलेला आहे.
गाव संघटनेच्या महिलांनी बेतकाठी येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी  पोलिस विभागाच्या सहकार्याने अथक परिश्रम घेतले.होते  त्यामुळे वर्ष 2017-18 मद्ये वर्षभर  दारूविक्री बंद होती. परंतु, त्यानंतर अवैध दारू विक्रेत्यांनी मुजोरीने गावाच्या निर्णयाचे उल्लंघन करून चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय पुन्हा सुरू करून गावात अवैध दारूविक्री होत होती. गावात  जवळपास 10 विक्रेते सक्रिय आहेत. दारूविक्री थांबविण्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने गाव संघटनेकडून वारंवार कृती केली जात आहे. परंतु, दारूविक्रेते शेतशिवाराचा आधार घेत अवैध व्यवसाय करीत आहेत. अशातच मुक्तीपथ टीम व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत शेतशिवरात शोधमोहीम राबविली असता, 8 ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्यासह एकूण 72 हजार रुपयांचा  किमतीचा  मुद्देमाल नष्ट केला. यावेळी तालुका संघटीका निळा किन्नाके, प्रेरक अरुणा गोन्नाडे, स्पार्क कार्यकर्ता भूषण डोकरमारे यांच्यासह गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.