लिफ्ट मध्ये अडकून 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 30, ऑक्टोबर :-  स्थानिक गोराई चारकोप मधील हायलॅंड ब्रिज इमारतीच्या लिफ्ट मध्ये अडकून एक 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. नगीना अशोक मिश्रा असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील चारकोप परिसरातील हायलॅंड ब्रिज इस इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी नगीना मिश्रा सकाळी माॅर्निंग वाॅकला जाण्यासाठी लिफ्ट ने खाली चालल्या होत्या. त्यावेळी लिफ्ट अचानक तिसर्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्यभागी अडकली. यामुळ घाबरून महिलाने आपल्या मुलाला आवजा दिला. त्याने लिफ्ट चा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडत असतांना त्या मुलाला विजेचा शाॅक लागल्यामुळे त्याने त्वरित जाउन विद्यूत पुरवठा बंद केला. विद्यूत पुरवठा बंद केल्यानंतर इमारतीच्या गेट वरील सिक्यूरिटी गार्डला सोबत घेउन लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता लिफ्ट अतिवेगाने तळमजल्यावर जाउन आदळली. त्यामुळे तळ भागाला दो मोठे होल पडले. या दुर्घटनेत वृध्द महिलाला गंभीर दुखापत झाली. त्यांना सोसायटीतील रविवाशांनी एक खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले.

हे देखील वाचा :-

died aftergetting stuckin an elevatorold woman