आ. गजबे यांचे गडचिरोलीच्या दारूबंदीला समर्थन – जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी आवश्यक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 30 जानेवारी: जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी कायम राहणे व २०२१ मधील नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. असे मत आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त करीत जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. दारुबंदीमुळे जिल्ह्यातील  दारु कमी झाली आहे. दारूबंदीमुळे स्त्रियांचा व जनतेचा फायदा झालेला आहे. ऐतिहासिक दारूबंदी टिकून राहावी यासाठी  राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. सोबतच जिल्ह्यातील हजाराहून अधिक गावांनी ठराव घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दारूबंदी कायम ठेवण्याची विंनती केली आहे.

लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान विविध गावांनी ठराव घेत दारूमुक्त निवडणुकीचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सुद्धा आ. कृष्णा गजबे यांनी दारूमुक्त निवडणूक व दारूबंदी मजबूत करण्याचा संकल्प केला होता. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा ८९, देसाईगंज २८, आरमोरी ४९,  कोरची ९२ अशा एकूण २५८ गावांनी दारूबंदी टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्याच्या दारूबंदीला व येणारी निवडणूक दारूमुक्त व्हावी यासाठी आ. कृष्णा गजबे यांनी समर्थन दर्शविले आहे. सोबतच महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी, अशी देखील मागणी केली आहे.

Krushna Gajabe