निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मजुरांचा जीव टांगणीला.
नांदेड दि२७ फेब्रूवारी:- कंधार तालुक्यातून नांदेड -बिदर राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 वरील फुलवळ गावाजवळील निर्मानाधीन असलेला पूल निकृष्ट कामामुळे कोसळलाय. आज सकाळच्या सुमारास फुलवळ गावा नजीक राष्ट्रीय महामार्गावर ह्या पुलाचे बाधकाम सुरु असताना हा पुल कोसळला.
या कामासाठी आरसीसी कॉलम बनवण्यात येत असलेले सेंट्रिंग पण पुर्ण पणे झुकलेली आणि क्रॅक झाली आहे. सुदैवाने यात काम करणारे मजूर वेळीच बाजूला झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाहि .बांधकाम करतानाच पुलाची अवस्था अशी झाल्याने पुढे या पुलाचे काय होणार असा प्रश्न सामान्यांना पडलाय…