पोलिसांच्या हातात बंदुका ऐवजी झाडू; कुरखेड्यात राबविले स्वच्छता अभियान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा, दि. ०२ जानेवारी: पोलीसांचा हातात आपण नेहमीच बंदूक व दंडुक बघतो मात्र आज शहरवासीयांना सुखद धक्का बसला..! सकाळी कुरखेडा येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात बंदूक न घेता झाडू घेत शहरात स्वच्छता अभियानात भाग घेतला.

यावेळी कुखेडा येथील तहसिल रोड, फवारा चौक, मुख्य बाजारपेठ, जुना बसस्थानक, स्टेट बैंक परिसर तसेच नविन बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर, तहसिलदार सोमनाथ माळी,  ठाणेदार सुधाकर देडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक शितल माने, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पारधी हवालदार उमेश नेवारे, विलास शेडमाके, मनोहर पूराम प्रफूल बेहरे, ललीत जांभूळकर, गौरीशंकर भैसारे, लोमेश पेंदाम, वालदे तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, गृहरक्षक दल व स्थानिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  

Kurkheda Police