लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 14 जून – गडचिरोली तालुक्यातील बामणी, मोहडोंगरी येथील दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून तपासणी केली असता, एक विक्रेत्याकडे 20 लिटर हातभट्टी दारु आढळून आली. याप्रकरणी येलवा ताडपल्लीवर या विक्रेत्यावर गुन्हा दाखल केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
बामणी गावात 4 दारू विक्रेते आहेत. या गावात मागील 1 वर्षापासून दारू विक्री सुरू आहे. दारूबंदीसाठी गाव संघटनेकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत.परंतु, दारू विक्रेते मुजोर असल्याने त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यामुळे गावात सायंकाळी दारू पिनाऱ्याची गर्दी राहत असून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशातच गाव संघटनेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने बामणी येथील दारू विक्रेत्यांच्या घरांची तपासणी केली. दरम्यान, येलवा ताडपल्लीवर या विक्रेत्याकडे 20 लिटर हातभट्टी दारू मिळून आली. पोलिसांनी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कलाम पठाण, मुक्तीपथ चे अमोल वाकुडकर, रेवणाथ मेश्राम , स्विठी आखरे यांनी केली.
हे पण वाचा :-