बोदली येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 1 सप्टेंबर : तालुक्यातील बोदली येथील विक्रेत्याकडून १३ हजार ५०० रुपये किमतीची ४५ लिटर मोहफुलाची दारू जप्त करून गुन्हा दाखल केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस, तमूस व मुक्तीपथ तालुका टीमने संयुक्तरित्या केली. यशवंत मदन जराते असे आरोपीचे नाव आहे.

बोदली येथे ८ विक्रेते दारू विक्री करतात. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू विक्री करू नये असे तोंडी सांगण्यात आले.  परंतु, मुजोर दारूविक्रेत्यानी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. यामुळे तंमुस समिती व गावातील नागरिकांनी पोलिस स्टेशनला निवेदन सादर करून विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन गडचिरोली पोलिसांनी बोदली गावाला भेट देऊन यशवंत जराते याच्या घराची तपासणी केली असता, अंदाजे  १३ हजार ५०० रुपये किमतीची दारू मिळून आली.
पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो.शी.धनराज चौधरी, स्वप्नील कुडावळे, शंकर पूंघाठी, तुषार खोब्रागडे, ऋषाली चव्हाण  यांनी केली. यावेळी त. मू.समितीचे पदाधिकारी देवेंद्र मेश्राम, अमृत निखोडे, देवेंद्र पिपरे, सुजाता पिपरे , विट्ठल पिपरे, मुक्तीपथ चे उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.

हे पण वाचा :-