पुणेकरांवर दुहेरी संकट झिका व्हायरसचाही प्रादुर्भाव वाढला

डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पुणे, 15 जुले – पुणेकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. डेंग्यूचे पाठापोठात आता झिका रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतो आहे.राज्यभरात झिकाचा धोका वाढला असून, झिकाची रुग्णसंख्या ही २५ वर पोहोचली आहे. तर झिकाचे सर्वाधिक म्हणजे २३ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत, पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आणि संगमनेरमध्येही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. झिका व्हायरसचा धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिका व्हायरसचा धोका महिला, पुरुष आणि तरुणांचा रुग्णांना असून लहान मुलांना धोका नाही.

झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील मोठी वाढ दिसून येत आहे. या जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण २१६ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील १५६ रुग्ण हे या आठवडाभरातील आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती जागा शोधून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना दिला आहे.

झिकापासून बचाव कसा कराल ?

घरात डास होऊ देऊ नका.
घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.
मच्छरदाणीचा वापर करा.
घरामध्ये साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये.
घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगा.

 

DenguePune cityZika virus