गडचिरोली जिल्हयात कार्यकाळ पुर्ण केलेल्या 47 पोलीस अधिकारी यांचा निरोप समारंभ पार पडला

कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफीसर ऑफ द इयर -2023” चा वार्षीक सन्मान सोहळा संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 13 जुले – गडचिरोली जिल्ह्रात आव्हानात्मक व खडतर सेवा पुर्ण केलेल्या 47 पोलीस अधिकारी यांची इतर जिल्ह्रामध्ये बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्या­या अधिकारी “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द मंथ” हा उपक्रम पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे पार पडला.

गडचिरोली जिल्ह्रामध्ये 10 पोलीस निरीक्षक, 05 सहा. पोलीस निरीक्षक व 32 पोलीस उपनिरीक्षक यांची बदली झालेली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल  यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमप्रसंगी बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांनी आपल्या मनोगतात गडचिरोली जिल्ह्रामध्ये काम करीत असतांना आलेले अनुभव कथन केले. तसेच गडचिरोली सारख्या माओवाद प्रभावीत जिल्ह्रात कशाप्रकारे आव्हानांना सामोरे जावे लागते व याठिकाणी केलेल्या खडतर कामाचा अनुभव नक्कीच भावी वाटचालीसाठी उपयोगी पडेल व गडचिरोली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.

यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन राबविण्यात येणा­या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर – 2023” च्या माध्यमातून गौरविण्यात आलेले आहे. उत्कृष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय म्हणुन उपविभाग पेंढरीची निवड करण्यात आली असून सदरचा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी जगदीश पांडे यांना 10,000/- रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रथम क्रमांक पोलीस स्टेशन मुलचेरा, द्वितीय क्रमांक पोस्टे सिरोंचा, तृतीय क्रमांक पोस्टे पुराडा यांनी पटकाविला असून प्रभारी अधिकारी यांना अनुक्रमे 10,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, 8,000/- रु. रोख व प्रशस्तीप्रत्र, 6,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच पोस्टे कोटगुल, पोस्टे भामरागड, पोमकें मालेवाडा, उप-पोस्टे जिमलगट्टा व पोस्टे मन्नेराजाराम यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करीता पोमकें ताडगाव यांना 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करिता पोस्टे मुरुमगाव यांना 3,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, तसेच उत्कृष्ट कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता पोमकें बेडगाव यांना 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता उप-पोस्टे दामरंचा यांना 3,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र सोबतच उत्कृष्ट कामगिरी (शासकिय योजना) करीता उप-पोस्टे राजाराम (खां.) 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (शासकिय योजना) करिता पोमकें घोट यांना 3,000/- रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट नाविण्यपूर्ण योजनेकरीता पोलीस स्टेशन कोटगुल यांना 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

माहे जानेवारी ते डिसेंबर 2023 या संपूर्ण वर्षात एकुण 2,46,362 लोकांपर्यंत विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यात गडचिरोली पोलीस दल यशस्वी झाले आहे. प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र 7612, प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना 40126, विविध प्रकारचे दाखले 188672, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा 183, रोजगार व व्होकेशनल ट्रेनिंग 1766, प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत 6549, प्रोजेक्ट शक्ती 580 व इतर उपक्रम 561 यांचा समावेश आहे.

सदर संपूर्ण कार्यक्रमयावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व शेवटी अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, याठिकाणी आपण बजावलेल्या उत्कृष्ठ कामगिरीकरीता मी आपले अभिनंदन करतो व भविष्यात देखिल आपण अशीच कामगिरी करुन महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचवाल अशी माझी अपेक्षा आहे. तसेच सदर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी/अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

gadchiroli police forcesगडचिरोली पोलीस