वाडा तालुक्यात बोरांडे येथील शेतकऱ्याचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वाडा/ पालघर, 6 एप्रिल :- वाडा तालुक्यातील बोरांडे गावातील शेतकरी भास्कर कृष्णा कवळे (63)यांचा वैतरणा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भास्कर कवळे हे मंगळवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास त्यांच्या म्हैशिना पाणी पाजण्यासाठी वैतरणा नदीमध्ये घेऊन गेले होते, मात्र बराच उशीर होऊन सुद्धा ते परतले नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी परिसरात व नदीपात्रात शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत, त्यामुळे मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवण्यात आले.

मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान सदानंद पाटील, नागेश पाटील ,दौलत भोईर यांनी अथक प्रयत्न करून, खोल नदी पत्रातून रात्री उशिरा भास्कर कवळे यांचा मृतदेह शोधून काढला. त्यानंतर वाडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. त्यानंतर आज सकाळी त्यांच्यावर बोरांडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे पण वाचा :-