हत्त्तीचा कळप पोरला वन परीक्षेत्र परिसरात

धान उत्पादक शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली :  दि. ०८ ऑक्टोबर,  रानटी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परीक्षेत्र परिसरातून परत गडचिरोली जिल्हयातील गुरवला, विहीरगाव परिसरात काही दिवस धुडगूस घालून  त्या नंतर तो पुन्हा अडपल्ली, गोगाव, महादवादी, चुरचुरा परिसरात येवून खरीप हंगामातील शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे धान पिकाचे नुकसान  करून  सदर हत्तीचा कळप हा आता पुन्हा सिर्सी-इंजेवारी परिसरात वानरी नाल्यालगत दिसून आलेला आहे. त्यामुळे सिर्सी  परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. 

त्या अगोदर सदर हत्तीचे कळपाने पोरला वन परीसरातील उपक्षेत्र चुरचुरा येथे मागील १० ते १२ दिवस ठाण मांडून बसला होता. तेथील शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे धान पिकांचे नुकसान करून काही दिवस दिभना, जेप्रा शेत शिवारात जाऊन धान पिकांची मोठया प्रमाणात नुकसान करून कळमटोला, धुन्देशिवणी मार्गे पाल नदी ओलांडून चुरचुरा परिसरात जाऊन १० दिवस शिरून मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान करून परत सदर हत्तीचा कळप हा आता पुन्हा सिर्सी-इंजेवारी परिसरात आलेला आहे. परंतु वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 

नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्याना झालेल्या  नुकसानीची नुकसान भरपाई अजूनही वन विभागाने दिलेली नाही. यामुळे शेतक्र्यात वनविभागाचा  रोष दिसून येत आहे.