खार महामंडळाच्या गोदमाला भीषण आग

कोट्यवधींचा कापूस जळून खाक .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना दि.१२ फेब्रुवारी :- जालन्यातील वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागून कोट्यवधींच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाले आहे .शहरातील राजूर मार्गावर असलेल्या वखार महामंडळाच्या १० नंबरच्या गोदामाला आज अचानक आग लागली. सीसीआय मार्फत खरेदी केलेला शेतकऱ्यांचा कापूस या गोदामात ठेवण्यात आला होता.

गोदमातून अचानक धूर निघत असल्याचं म्हणदलाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ  अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले असून अनेक खाजगी टँकरच्या माध्यमातून अग्निशमन विभागाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुय.दरम्यान अंबड, जाफराबाद,जालना शहरातून अग्निशामक बंब च्या वतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उपविभागीय दंडाधिकारी संदीप सानप आणि माजी राज्यमंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान,याआगीत गोदामात ठेवलेल्या कापसाच्या सुमारे ४५०० गाठी जळून खाक झाल्याने कोट्यावधी रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाजा खोतकरांनी व्यक्त केला.