लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. २७ जुलै : दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवरील डॉक्टरने एका गंभीर रुग्णाला तपासणीअभावी मृत घोषित करून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रुग्णाला थेट शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मात्र शवविच्छेदनगृहात पोहोचण्याआधीच रुग्णाला शुद्ध येऊन त्याने हालचाल केली. त्यामुळे तो जिवंत असल्याचे लक्षात आले.
या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. तत्काळ रुग्णाला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या सुधारत आहे.
या वैद्यकीय हलगर्जीपणामुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव