तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा 5.3 तिव्रतेची भुकंपाचे झटके.

गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे. तेलंगणातील ज्या मुलुगू येथे या भूकंपाचे केंद्र होते ते ठिकाण सिरोंचापासून सर्वाधिक जवळ, म्हणजे जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र सिरोंचाच नाही तर कोरचीपर्यंत या भूकंपाची कंपनं जाणवली.

अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

earthquakegadchiroli earthquaketelangana earthquake