लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 25 ऑक्टोबर :- मुंबई येथील साकीनाका येथील असल्फा परिसरातील मस्जिद गल्ली परिसरातील कचरा गोदामाला भीषण आल लागली आहे. आतापर्यंत आगीचे कारण अस्पष्ट आहे. गोदामात प्लास्टीकचा कचरा मोठ्या प्रमाणात भरलेला असल्याने आग भडकली ज्यामुळे परिसरात सर्वत्र धुराचे साम्राज्य असल्यामुळे परिसरातील नागरिकांेना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चिंचोळ्या गल्लीत आग लागल्यामुळे अग्निशमन दल आणि पोलीस दलाकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी फायरद ब्रिगेडच्या 4 गाड्या आणि 4 टॅंकर तैनात करण्यात आले आहे.
हे पण वाचा :-