कोयनानगर येथील नियोजित एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राबाबत मुख्यमंत्र्यांकडे होणार सादरीकरण

महिन्याभरात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 7 जुलै : कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याबाबत पुढील एका महिन्याच्या आत सविस्तरप्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजदेसाई यांनी आज दिली.

कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या सद्यस्थितीचा आढावा आज गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी घेतला. हा प्रकल्प देसाई यांचे संकल्पनेतून साकारला जाणार असून या प्रकल्पाला तातडीने मूर्त स्वरूप देण्यासाठीशासन स्तरावर भक्कमपणे पाठपुरावा त्यांनी केला आहे. या बहुउद्देशिय प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरन भेटी दरम्यानतत्वत: मान्यता दिली असून या प्रकल्पाचा आराखडा तयार करून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याआहेत. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश देसाई यांनी यावेळी दिले.

पावसाळ्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात पुर परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी मदत कार्यासाठी एनडीआरएफ, पोलीस, एसआरपीएफ आदी दलांची आवश्यकता असते. हे मदत कार्य लोकांपर्यत जलदगतीने पोहोचविण्यासाठी कोयनानगर येथे नियोजित असलेले राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याची गरज आहे. या भागात सर्व सोई सुविधा आहेत जागाही शासनाचीच असल्यामुळे जागेचाही अडसर दूर झाला आहे.

या एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी ३२ हेक्टर अर्थात ८० एकर जागा उपलब्धअसून ती महसुल विभागाकडे वापरात नसलेली जागा आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी गट/सर्व्हे क्रमांक२५,२६,२७ या क्षेत्रातील जमीन महसूल विभागाची आहे. ती जागा महसूल विभागाकडून गृह विभाग अथवा पोलीस महासंचालक कार्यालयाकडेहस्तांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाकडे सादर करावा व त्यासाठी जलदगतीने पाठपुरावा करावा, असेनिर्देश देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना दिलेत.

मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांण्डेय,गृह विभागाचे प्रधानसचिव संजय सक्सेना, सहा. पोलीस महासंचालक एस जगन्नाथन, वित्त विभागाचे सह सचिव विवेक दहीफळे, साताराचे पोलीस अधीक्षकअजयकुमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटपा करिता अर्ज आमंत्रित

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप

 

lead storyshambhoraj desai