लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 12 एप्रिल : चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने एक अनोखा रिव्हर्स ट्रॅप यशस्वी केला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराने चक्क तपास अधिकाऱ्याला न्यायालयाच्या हजर राहण्याच्या अटीपासून सूट देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच दिली. या स्वस्त धान्य दुकानदाराला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. चंदू रामचंद्र बगले असे अटकेतील स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे. जिल्ह्यातील अशी ही पहिलीच कारवाई आहे.
हे पण वाचा :-