मासे नेणारा ट्रक तलावात पलटी झाल्याने मासे पकडण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापुर –  राज्यभरात  कोरोनामुळे जमावबंदी व संचारबंदीसारखे निर्बंध कडक केलेले असताना सोलापुरात आज सकाळी सोलापूर-विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला हे मासे नेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हा मासा घेऊन जाणारा ट्रक विजापूरहून सोलापूरकडे येत होता रस्त्याच्या कठड्याला ट्रकने धडक दिली. ट्रक पलटी होताच त्यातील जिवंत मासे तलावाच्या सुकत चाललेल्या पाण्यात पडले. या घटनेची माहिती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली यामुळे हे मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

राज्यात ऐन कोरोनाचा उद्रेक असतांना देखील येथील नागरिकांनी कोव्हीड-१९ च्या नियमाचे पालन न करता मोठ्या संख्येने पिशव्या भर मासे पकडण्यासाठी मागे पुढे न पाहता तलावाच्या चिखलात उतरले. हि झुंबड पाहण्यासठी तालावाबाजुला असलेल्या लोकांची गर्दी झाली होती.

 

पोलिस विभागाला या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून मासे घेऊन जाणाऱ्या लोकांना हुसकावून लावले.

हे देखील वाचा :

अमरावती जिल्ह्यातील १३० गावांचा १० दिवसासाठी कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू