लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ठाणे 23 सप्टेंबर :- ठाणे येथील मुंब्रा येथे आर्मीच्या परीक्षेसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणाचा फलाटावरच लोकलची जोरदार धडक लागून जागीच मृत्यू झाला आहे. रामेश्वर भारत देवरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक रामेश्वर हा धुळ्यात कुटूंबासह राहत होता. तो आर्मीची परीक्षेसाठी आला होता. दरम्यान तो मुंब्रा स्थनाकात २१ सप्टेंबर रोजी बुधवारी सायंकाळच्या सुमारास आला असता, त्याला उलट्या झाल्यासारखे वाटल्याने तो मुंब्रा स्थानकातील ३ नंबर फलाटजवळ बसला. त्याच सुमारास भरधाव लोकल याच फटलावर येत होती. मात्र त्याला दिसली नाही आणि त्याचा लोकलची जोरदार धडक बसल्याने तो फलाटावरच हवेत उडून १० ते १५ फूट फेकला गेला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याला येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. त्यांचे पार्थिव धुळे येथे पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :-