दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने एका तरुणाचा मृत्यू, तर सोबती जखमी..

आलापल्ली–मुलचेरा मार्गावरील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, 10 ऑगस्ट — आलापल्ली–मुलचेरा मार्गावरील मौजा बोटलाचेरू गावाजवळ झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे.

मृतकाचे नाव संतोष लक्ष्मण कुळमेथे (वय 21, रा. आशा, पोस्ट कमलापूर, ता. अहेरी) असे असून, जखमीचे नाव अक्षय रवींद्र नमो (वय 19, रा. टेकडी कॉलनी, आलापल्ली) असे आहे. संतोष आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्प्लेंडर (MH 33 AL 8828) दुचाकीवरून आलापल्ली येथून खुदीरामपल्लीकडे जात असताना बोटलाचेरूच्या वळणावर दुचाकी घसरून रस्त्यावर पडली.

अपघातात संतोषच्या छातीला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने दोघांना उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संतोषला मृत घोषित केले. जखमी अक्षयला अधिक उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

मुलचेरा अहेरी मार्गावर खड्ड्यांचा साम्राज्य बनलेला आहे वारंवार होणारा अपघात हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक लोकांची होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

Byke accidentMulchera road accidentspot dead