एका तरुणाने कोरोना रुग्ण व पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी विनाशुल्क ऑटोसेवा केली सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. २५ एप्रिल: देशात कोरोनाचे संकट आल्याने त्या संकटला सावरण्यासाठी अनेक दानशूर लोक आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत लोकांना मदत करतात असाच एक तरुण नांदेड शहरात आपल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत लोकांची सेवा करतोय. या तरुणाने शहरातील कोरोना रुग्ण व पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी विनाशुल्क ऍटो सेवा सुरू केली आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्ण व त्यांचे नातेवाई तसेच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी असल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांची प्रकृती अचानक बिघडल्यास त्याच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकीतून निलेश सुभाषराव डोंगरे या तरुणाने किरायाने ऑटो घेऊन विनामूल्य सेवा सुरु केली आहे. त्यांच्या सेवेचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

सध्या राज्यात व जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव उपाययोजना मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहर व नवीन नांदेड परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने व पोलीस कर्मचारी बांधव बंदोबस्तासाठी असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अचानक दवाखान्यात जायचे असल्यास वाहने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. तेव्हा होणारी गैरसोय लक्षात घेऊन हडको भागातील तरुण व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय स्तरावर तलवारीबाजी खेळाचे नेतृत्व करणारा निलेश सुभाषराव डोंगरे या युवकाने सामाजिक भावनेतून ऑटो चालवणाऱ्या या युवकाने किरायाने ऑटो घेऊन विनामूल्य सेवा देण्यासाठी फेसबुक व व्हॉटसअॅप, ऑटोवर मोबाईल नंबर पाठवून या सेवेत कोरोना तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना व गरजूंना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही सेवा त्यांनी सुरू केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांसह पोलीस कर्मचारी यांच्या मोबाईलवर संपर्क साधून या सेवेचा लाभ घेत आहेत.

सामाजिक कामासाठी आपणाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा राज्य पुरस्कार प्राप्त जे. ई. गुपीले, कमल फाऊंडेशनचे अमरदीप गोधने, युवा ग्रुपचे सतीश बसवदे यांच्याकडून प्रेरणा मिळाली असल्याचे सांगून समाजसेवा करण्यात आनंद मिळत असल्याचे सांगत त्यांनी गरजूंना या विनाशुल्क सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे.