संत तुकारामांची अभंग वाणी वारकरी परंपरेचा मुख्य आधास्तंभ :- डॉ.श्रीराम कावळे

संत तुकाराम जन्मोत्सवात *श्री. संजय गोडे यांच्या (स्वरांजन -संच ) अभंगगायनाने गोंडवाना विद्यापीठ परिसर मंत्रमुग्ध..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे संत तुकाराम महाराज अध्यासनाच्या वतीने “संत तुकाराम जन्मोत्सवाचे तीन सत्रात आयोजन केले होते. अभंग गायन, व्याख्यान आणि वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण अशा वेगवेगळ्या तीन सत्रात उत्सव साजरा झाला. माननीय कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाने संत तुकाराम महाराज जन्मोत्सवाचे आयोजन केले होते. या समारंभाचे उद्घाटन मा. प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी डॉ.कावळे म्हणाले की, संत तुकारामांची अभंग वाणी वारकरी परंपरेचा मुख्य आधास्तंभ असून आजही लोकांच्या ओठावर तुकोबाचे अभंग आहेत. त्यांच्या अभंगातून मानवी मूल्याचे दर्शन घडते. मानवी मूल्ये जतन करणारे ज्ञान आहे. पुढच्या पिढीला आदर्श माणूस घडविणारे ज्ञान सदैव उपयुक्त ठरेल,असे ते बोलत होते.
संत तुकाराम जन्मोत्सवाच्या पहिल्या सत्रात वणी येथील श्री. संजय गोडे आणि संच (यवतमाळ) यांच्या अभंग गायनाने झाली.”आनंदाचे डोही आनंद तरंग” सुंदर ते ध्यान,आनंदाचे डोही आनंद तरंग,नमीला गणपती,उच्च निच्च काही नेणे भगवंता,खेळ मांडीयेला,वृक्षवल्ली आम्हा सोयरे,आता कोठे द्यावे मन,
जैसी गंगा वाहे,तुझ्या नामाची आवडी, हे चि दान देगा देवा अशी अनेक अभंग एकामागून एक गायली गेली. गोंडवाना विद्यापीठ परिसरात तुकारामाची अभंगवाणीने परिसर मंत्रमुग्ध झाला.

यावेळी प्रमुख उपस्थिती जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन सल्लागार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ.शांताराम बुटे, सिनेट सदस्य तथा सल्लागार समिती आजीवन सदस्य डॉ. दिलीप चौधरी, डॉ.संजीव कोंडेकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व आभार अध्यासन समन्वयक डॉ. हेमराज निखाडे, सूत्रसंचालन डॉ.सविता गोविंदवार यांनी मानले. डॉ. संतोष देठे,डॉ.कैलास निखाडे , डॉ. वानखेडे, डॉ. ज्योती पायघन डॉ.अमित गजबिये,डॉ.शिल्पा आठवले,डॉ. मनीष देशपांडे,प्रा.रोहित कांबळे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.