अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदतीचा दिला होता शब्द
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर 10 सप्टेंबर :-  जून , जुलै ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल असे सांगितले होते आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले होते.

त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून ३ हजार ५०१ कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी १३६०० प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल.

हे देखील वाचा :-

विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्यांचा मृत्यू

chandarpurchandrpur floodflood relief