मकरसंक्रांतीसाठी मडके (सुगडे) बनविण्याची लगबग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम २८ डिसेंबर :- दीपावलीचे जसजसे दीवस सरतात तस तसे वेध लागतात ते मकरसंक्रांतीचे, या सनाला हींदु संस्कृती मधे महत्वाचे स्थान आहे. या दीवशी स्ञीया मातीच्या छोट्या मडकीत ज्वारीचे कणीस, गव्हाच्या ओंब्या, उसाचे तुकडे, भुईमुंगाच्या शेंगा, बोर, हरभरा घाटे टाकुन पुजा करण्याची प्रथा आहे.


पंधरा दीवसावर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांती निमित्त मडकी बनवीण्यासाठी कुभांर बांधवांनची धावपळ सुरू आहे. प्राचीन काळापासून मडकी बनवीनारा कुभांर व्यवसाय आजच्या बदलत्या काळात देखील आपले अस्तित्व टिकवून आहे. मकरसंक्रांत 15 दीवसावर येऊन ठेपली असुन वाशिम येथील कुभांर बांधव मकरसंक्रांतीची मडकी बनवीण्यात चांगलेच व्यस्त झाले आहेत .