ग्रामपंचायत सचिवाची कर्तव्यावर गैरहजेरी ; गोंडवाना गोटूल सेनेची निवेदनातून तक्रार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

धानोरा -गडचिरोली 24 सप्टेंबर :-  पेंढरी-गट्टा अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायत मधील सचिव हे एका आठवड्यातून मंगळवार किंवा गुरुवारी फक्त आपली ड्यूटी बजावत असतात. बाकीचे दिवस पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये मिटिंग असल्याचे कारण देवून ग्रामपंचायतीच्या कामासाठी गैरहजर राहतात. या कारणास्तव येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचे दाखले हवे असल्यास सचिव अनुपस्थित असल्याने मिळण्यास गैरसोय होते. त्यामुळे ग्रामस्थांची कामे अडून पडली आहेत.तसेच विकासकामांना खिळ बसली आहे.

याप्रकरणी संबधित अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील सचिवांनी स्थानिक पातळीवर वास्तव्यास राहून काम करण्याचे आदेश निर्गमित करावेत. जेणेकरून ग्राम पातळीवरील कामास गती प्राप्त होईल. आणि नागरिकांची कामे होण्यास अडचण होणार नाही. अश्या प्रकारचे निवेदन गोंडवाना गोटूल सेनेचे गडचिरोली जिल्हा सचिव परमेश्वर शेषराव गावळे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांना देण्यात आले आहे. याची प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद गडचिरोली, खासदार गडचिरोली, आमदार गडचिरोली यांना देण्यात आली आहे.

हे पण वाचा :-